0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, युनिसेफच्या सामाजिक शाखेच्या तज्ज्ञ अनुराधा नायर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  याकामी युनिसेफच्या मुख्य क्षेत्रिय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर, युएन विमेनच्या भारत, भूतान, मालदिव आणि श्रीलंका देशांसाठीच्या उपप्रतिनिधी निस्था सत्यम आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.युएन विमेन, युनिसेफ यांच्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला असून आर्थिक वर्ष 2020-21 पासून राज्याचे लिंग आधारित विवरणपत्र आणि बालअर्थसंकल्प विवरणपत्र प्रसिद्ध करण्याची  शिफारस अहवालात  करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top