0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा  |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभुमीवर शरद पवारांनी मनधरणी करण्यासाठी उदयनराजे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मला भाजपमध्ये जावे लागत आहे, तुमच्या विषयी माझ्या मनात सदैव आदर असेन तुमचे आशीर्वाद असुद्या असे म्हणून उदयनराजे यांनी पवारांचा निरोप घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. इतर माध्यमांनी देखील असे वृत्त दिले आहे. दरम्यान, उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

Post a comment

 
Top