0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर  |
नगर-पुणे महामार्गवर जातेगाव फाट्यावर ट्रक आणि मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने सुपा, शिरूर येथील खाजगी आणि नगरच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृत-जखमी एकाच कुटुंबातील नातेवाईक आहेत.
लक्ष्मी वसंत दोमल, विश्वनाथ बाळराम धीमन अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बस मधील इतर पंधराजन जखमी आहेत. हे सर्व नातेवाईक आळंदी (जि-पुणे) येथे एका दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून नगरकडे परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास जातेगाव फाट्या जवळ नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचा पुढचा टायर अचानक फुटून ट्रक डीवायडर तोडून नगरकडे येणाऱ्या मिनी बसवर धडकली. या धडकेत बस मधील दोन प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले. तर इतर सर्व पंधराजन जखमी झाली. घटनेनंतर सुपा पोलिसांनी धाव घेत मदत कार्य केले.

Post a comment

 
Top