0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
महावितरणच्या अद्यावत  सिटीझन चार्टरचे (नागरिकांची सनद) प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.  ग्राहकांना दैनंदिन जीवनात कंपनीशी संबंधित विविध सेवा मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींची माहिती या सिटीझन चार्टर मध्ये देण्यात आली आहे. ग्राहक सेवेच्या बांधिलकीतून कंपनीने उचललेले हे एक महत्वपूर्ण  पाऊल आहे. 'सिटीझन चार्टर' मध्ये ग्राहकांना आवश्यक सर्व सेवा-सुविधांच्या माहितीचा समवेश करण्यात आला असून या सर्व माहितीची मांडणी सोप्या व सुटसुटीत पद्धतीने करण्यात आली आहे. अद्ययावत सिटीझन चार्टर महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या  नवीन अद्यावत सिटीझन चार्टरमुळे महावितरणच्या ग्राहक सेवेत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतील असा विश्वास महावितरणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. 

Post a comment

 
Top