0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
भांडवली खर्चातून रस्ते दुरूस्तीची बिले न काढण्याचे आदेश देतानाच कोणते रस्ते दोष दायित्व कालावधीमधील(डीएलपी) आहेत आणि त्याच्या दुरूस्तीसाठी किती खर्च केला याची माहिती सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी व नगर अभियंता यांना दिल्या. शहरातील खड्ड्यांबाबत प्राप्त होणाऱया तक्रारींच्या अनुषंगाने जयस्वाल यांनी शनिवारी सर्व अधिकाऱयांची विशेष बैठक आयोजित केली होती. बैठकीत त्यांनी शहरातील खड्ड्यांबाबत आढावा घेतला आणि यापुढे प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा खड्डे भरण्याच्या कामाला लागावे, असे सांगितले.


Post a comment

 
Top