BY -
युवा महाराष्ट्र लाईव्ह - औरंगाबाद।
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या
संयुक्त विद्यमाने ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी
मुकुंद चिलवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय
ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्य्क
श्याम टरके, रेखा पालवे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील
कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.
Post a comment