0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७० वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सवा दरम्यान विविध नाविन्यपुर्ण उपक्रम आयोजित करण्याची मंडळाची परंपरा मंडळाने यंदाही कायम राखली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विविध विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येते. यंदाच्या वर्षी व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृतींचे अनोखे भव्य प्रदर्शन दि. आजपासून दिनांक ६ सप्टेंबर २०१९ या कालावधीत सुयोग मंगल कार्यालय, टिळकनगर, डोंबिवली (पुर्व) येथे आयोजिण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी १० वाजल्यापासून ते रात्रौ १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनास ठाण्याच्या जोशी एन्टरप्रायझेसचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
तसेच सदर प्रदर्शनास रू. १०/- मात्र इतके देणगी प्रवेश मुल्य आकारण्यात आले आहे. सदर देणगी मंडळाच्या सेतु-एक हात मदतीचा या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे. आज डोंबिवलीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व गटनेते श्री. मंदार हळबे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मंडळाच्या विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे या प्रदर्शनातून जमणाऱ्या निधीतून पुरग्रस्तांना मदत करण्याच्या मंडळाच्या अभिनव संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले.  प्रदर्शनाचे प्रायोजक श्री कौस्तुभ कळके यांनी देखील अशा अनोख्या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये सहभागी होऊन सहसा न बघायला मिळणाऱ्या गाड्या डोंबिवलीकरांना बघता येणार आहेत व या प्रदर्शनातून जमणारा निधी पुरग्रस्तांना दिल्याने त्यांनाही मदत होणार आहे  या गोष्टींचे समाधान असल्याचे सांगितले. सदर प्रदर्शनात सुमारे २७५ हून अधिक व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. गेल्या तीस वर्षांपासून पुण्याच्या RTO मध्ये काम करणारया श्री रत्नाकर जोशी यांनी देश विदेशातील विविध गाड्यांचा प्रतिकृतींचा संग्रह केला आहे. त्यामध्ये देशा बरोबरच अमेरीका , इंग्लंड आणि आँस्ट्रेलियातील विविध मोटार कंपन्यांनी काढलेल्या जगप्रसिद्ध मोटारींच्या २७५ हून‌ आहेत.डोंबिवली मध्ये या अनोख्या प्रदर्शनाचे प्रथमच आयोजन होत असल्याने सर्व नागरिकांना मंडळातर्फे आगत्याचे निमंत्रण मंडळाचे कार्यवाह श्री. केदार पाध्ये यांनी केले.

Post a comment

 
Top