0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गूगल अॅडसेन्सच्या अधिकृत भाषेच्या यादीत आता मराठी भाषा आली आहे. मराठी भाषकांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंटरनेटच्या जगतात खऱ्या अर्थाने मराठीला मानाचं स्थान मिळालं, असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. कारण यापूर्वी गूगलने बंगाली, तमिळ या भाषांना अॅडसेन्समध्ये अधिकृत भाषेच्या यादीत स्थान दिलं होतं. यामुळे मराठी संकेतस्थळांना गूगलकडून येणाऱ्या जाहिराती मिळणार आहेत.गूगलच्या दृष्टीकोनातून बंगाली बांगलादेशातही बोलली जाते, तसेच तमिळचा वापर श्रीलंकेतही असल्याने त्या भाषांचं महत्व होतं, यानंतर हिंदीला या यादीत स्थान मिळालं. आता मराठी भाषेच्या संकेतस्थळालाही ऍडसेन्सच्या जाहिराती लावता येणार आहेत. 

Post a comment

 
Top