0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य् रजि. ठाणे यांच्या वतीने सामाजिक बांधलकी जपत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त् विभागातील जिल्हापरिषद शाळा सोंडोली, शित्तुर, उखुळ, गोंडोली, जांबुर, थावडे, मालगाव, कांडवन, पाटील वाडी, तुरूकवडी, शाहूवाडी, मराठवाडी, करूंगली, कांडवण, शाहुवाडी मधील अनाथ आश्रम (निवासी) शाळा, उदयगिरी विद्यानिकेत विरळे, वारण माध्यमिक विद्यालय सोंडोली अशा 60 शाळा मधील 4000 हजार विध्यार्थ्यांना वहृया आणि कंपास मधील साहित्य्, पेन्सिल, पट्टी, पेन यासारखे शैक्षणिक साहीत्य् वाटले. या कार्यक्रमासाठी विविध गावचे सरपंच, पाटील, शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
या कार्यासाठी महाराष्ट्रातील क्लास संचालकानी मदत निधी दिला. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, कार्याअध्यक्ष् विनायक चव्हान, रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल काकुळते, रविंद्र प्रजापती, कोकाटे सर, अन्वर सय्यद, बबन चव्हान संघटनेचे कार्यकर्ते ठाण्यावरून आले होते. तसेच हे कार्य पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य् सभापती माननीय सर्जेराव पाटील (दादा), थावडे गावचे डे. सरपंच शिवाजी बंडू पाटील, पोलीस पाटील विलास पाटील, मा. डे. सरपंच रवि तवरे, मा. डे सरपंच विश्वास पाटील, बाबू पाटील, राम पाटील, विष्णू पाटील, नामदेव पाटील, विशाल पाटील, बिळाशी गावचे आरोग्य् अधिकारी डॉ पाटील, जांबुर गावचे पत्रकार केशव पाटिल डिगे, मारूती पाटील यांचे सहकार्य लाभले.

Post a comment

 
Top