0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक बस (Electric ST bus) दाखल झाली आहे. देशातील अशा पहिल्या बसचं (Electric ST bus) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लोकार्पण करण्यात आलं. एकदा चार्ज केल्यानंतर किमान 300 किमीचा पल्ला गाठणारी ही बस जवळच्या दोन शहरांमध्ये चालवली जाणार आहे.एसटीमध्ये लवकरच अशा साधारण 150 बसेस दाखल होणार आहेत. ‘पर्यावरणस्नेही बसेस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करुन दिवाकर रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘शिवनेरी, शिवशाही आणि विठाई बसच्या यशानंतर विद्युत बस ही ‘शिवाई’ नावाने ओळखली जाईल’, अशी घोषणा रावते यांनी केली.

Post a comment

 
Top