0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. आपण दगडावर रेषा उमटवणारे लोक आहोत. तुम्ही देशासाठी अमुल्य योगदान दिले. चंद्रावर जाण्याच आपले स्वप्न आणखी प्रबळ झाले आहे. इस्रो चंद्राच्या सर्वात जवळ गेले. अडचणी आल्या तरी हिंमत सोडू नका. इस्रो कधीही हा न मानणाऱ्या संस्कृतीचे प्रतिक आहे. कीतीही अडचणी आली पण तुम्ही प्रयत्न सोडू नका, भारत जगातील महत्वाच्या पॉवर स्पेस मधील एक म्हत्वाच देश. याच लोकांनी मंगळावर झेंडा फडकवला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्राज्ञांच्या कौतुक केले. आज सकळी मोदींनी देशाला संबोधित केले. या संबोधानंतर मोदींनी इस्रोच्या अध्यक्षाची गळाभेट घेतली तेव्हा मोदी आणि इस्रोच्या अध्यक्ष डॉ. के. सिवन दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.

Post a comment

 
Top