0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड, ठाणे |
मुरबाड मध्ये प्रथम घडतंय तेच राज्यात घडतंय असा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस तदनंतर राष्ट्रवादी त्यातुन निर्माण झालेली भाजपासेना नेतावृली खर्या निष्ठावंत भाजपासेना कार्यकर्त्यांना नाराजीच्या सुरात झोंबलीच परंन्तु आम्ही झाकलीमुठ तुमच्या सव्वा लाखाची असा संप्तत सवाल मतदार कार्यकर्ते नेत्याना  दिसत आहेत.भाजपासेना निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन आजही निष्ठावंत आहेत.त्यांनी कधी लोकप्रतिनिधीत्वाचे स्वप्न पाहिले नाही ज्यांनी पाहिले त्यांना मिळाले नाही मात्र आजही त्यांचा निष्ठावंतपणा घुंगरूजीना लाजवेल असाच आहे.मात्र येत्या विधानसभेला खरी मस्ती नेत्यांची मतदारासमोर येणार असुन मतदारांचा कौल कोणाचा ढोल वाजवेल याचा नेम नाही.येत्या विधानसभेत सत्ताधार्यांच्या मनात धडकी भरली आहे निवडुन  इतिहास घडणार नाही आणि विरोधक काँगे्रस राष्ट्रवादीचा मडका फुटलेलाच आहे.त्यामुळे त्यांना फरक पडणार नाही अशा रंगतदार मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजपा सेना राष्ट्रवादी काँगे्रस तिरंगी लढत झाल्यास नवा पर्याय तरूणार्इ बेरोजगारी शेतकरी कष्टकरी यांच्या समोर येणार आहे.मुरबाड इतिहासीक नगरी आहे.निवडणुकीपुरते ढोल वाजवणारी भुमी नाही आजपर्यंत जातीपातीचा पैशाची कुस्ती खेळली  समोर एकाच आळीतील कोंबडे आपल्यासमोर दिवाळीला झुंझताना दिसत होते.हरला तोही आपला जिंकला तोही आपला मात्र येत्या निवडणुकीत कडकनाथ कोंबडा झुंजीत सामील होणार आहे.त्यांची तयारी दिपावलीच्या सणात सामान्य माणंस करत आहेत.हा सुध्दा इतिहासीक खेळ समजला जाणार आहे.दिपावली सणात आपल्या ग्रामीण भागात टोणग्याची झुंज लागते बैलाची लागते कोंबडयांची लागते त्याचा आनंद  घेतात परंन्तु आता नविन कोंबडयाची जात आली आहे.अतिशय कडवंड ती म्हणजे कडकनाथ येत्या विधानसभेत पैशाचा पाऊस पडेल दिपावलीचा सण आनंदात जार्इल मात्र मतदाराना आकर्षित करण्यासाठी नेत्यांची धकधक वाढणार आहे.मुरबाड विधानसभा मतदार संघात पहिले लाखाच्या निवडणुका होत्या आता कोटीच्या झाल्या आहेत.तरीही मतदानाच्या वेळी घरही फिरते आणि घरचे वासेही फिरतात याचा अनुभव अनेकाना आला आहे.मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजपा सेना युती झाल्यास राष्ट्रवादी काँगे्रसला फायदा होर्इल आणि भाजपा सेना राष्ट्रवादी तिरंगी लढत झाल्यास राष्ट्रवादी काँगे्रसचा कणखंर उमेदवाराला फायदा होर्इल अशी राजकीय स्थिती निर्माण झाल्याचे सध्य चित्र आहे.सामान्याच्या तक्रारीकडे नेहमीच सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केले.भ्रष्ताचाराला बळ दिले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव  नाही.बोगस कामे दाखवून कोटीच्या भ्रष्ताचारात ठेकेदार कार्यकर्ता जोपासला कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपंचायतसह पंचायत समितीच्या अनाधिकृत बांधकामे घरकुले शासकीय योजनाचा बोजबारा उडवणार्याना झुकते माप दिले त्यानांच मदत केल्याने असंख्य सामान्य माणंस नाराज आहेत.परंन्तु सत्तेपुढे शहाणपणा नाही जेव्हा वेळ येते त्यावेळी जागा रिकामी होते जेव्हा काळ येतो तेव्हा जागा भरते  मानसिकतेत सामान्य नागरिक जीवन जगत आहेत.त्यांना निवडणुका आल्या काय आणि गेल्या काय याचा फरक पडत नाही मात्र काळ वेळ एकाच क्षणात सारं गमवते याचा धावा करणारे काय दुवा कोणासाठी मागतात हे येत्या महिण्यात ठरेल यात शंका नाही.मुरबाड विधानसभेत कल्याण बदलापुर मुरबाड असे तीन भाग आहेत.कल्याण मध्ये आजपर्यंत समसमान मतदान  उमेदवाराना झाले आहे.मुरबाड बदलापुर ज्या तालुका शहरात वास्तव्य ज्या उमेदवाराचे आहे त्यांना झुकतेमाप देतात परंन्तु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बदलापुरमध्ये जास्त मते मिळण्याची शकेता असुन मुरबाड कल्याण मध्ये विजयाचा झेंडा रोवण्याची संधी आहे.परंन्तु राष्ट्रवादीकँगे्रस भाजपा सेना यांच्यात होणारी निवडणुक भाजपा आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाणार असुन राष्ट्रवादी पराभूत झाली काय  विजयी झाली काय काहीही फरक पडणार नाही मात्र नव्या समिकरणे नवे नेतृत्व उभे राहिल अशी अपेक्षा बाळगुन मतदार आहेत एकमात्र खरी बाळयामामा म्हात्रे राजाराम साळवी वामन म्हात्रे यांना पडलेली मते आंदाज आणि कडकनाथ विसरून चालणार नाही.


Post a comment

 
Top