0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - ठाणे ।
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात लक्ष हजारो कोटींची टेंडर कामे,त्यांची बिले यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्यांची चौकशी र्इडी मार्फत करण्याची मागणी एका ज्येष्ठ पत्रकारांनी केली होती तसेच  कानी या खात्याचा भ्रष्टाचार उघड करणार असा इशारा दिला होता त्यांचा धसका घेऊन ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एधकार्‍यांनी काही ठेकेदारांशी संगणमत करून थोडीफाडी आग लावून शॉर्टसर्किटने आग लागली त्यामध्ये कागदपत्र जळाले असा माहोल उभा केला असावा अशी चर्चा असून केंद्र सरकारने त्याची चौकशी सी.बी.आय मार्फत करावी अशी मागणी समाजसेविका तथा पत्रकार सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी केली आहे.

            शॉर्टसर्किटने आग लागली त्या अधिकार्‍यांच्या जबानीवरून चौकशी थांबली का ? ही घरात लागलेली आग नाही हा भ्रष्टाचाराच्या बंगल्यात लागलेली आग आहे.हेच अधिकारी आता त्यांच्याच ठेकेदारांना सांगतात तुमचे टेंडर कागदपत्र जळाले आम्ही काय करू,मात्र खरच जळाले असतील त्यांची नोंद पोलिसांत केली काय ?  कागदपत्र कोणते जळाले यांची माहिती सामाजिक कार्यकर्ते घेणार असून ठाणे जिल्हयातील कोटी रूपयाचा भ्रष्टाचार मुरबाड,शहापूर,कल्याण,भिवंडी ग्रामीण आणि शहरी भागात झाला आहे.खोटे कागदपत्र तयार करून झालेला भ्रष्टाचार महाराष्ट्र शासनाने दडपला त्यांचाही वाटा किती असा सवाल उभा राहत आहे ( क्रमशः भाग - 1 )

Post a comment

 
Top