0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
गेली अनेक वर्षे ठाणे जिल्हयात राष्ट्रवादी काँगे्रस विरूध्द शिवसेना भाजपा अशी लढत होत होती परंन्तु येत्या विधानसभेत ठाणे जिल्हयात चुरशीच्या निवडणुका पहाण्यास मिळणार आहेत.काँगे्रस राष्ट्रवादीमधुन भाजपा सेनेत गेलेले गयारामच भाजपा सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि प्रस्तिस्पर्धा उमेदवार असणार त्यांचा फायदा नव्या चेहर्‍यांना होणार असून 47 टक्के विरोधी मतदार कोणत्या नेतृत्वाला संधी देतो याकडे जाणकारांचं लक्ष वेधले आहे.नवीमुंबर्इ मध्ये गणेश नार्इक यांचा मंदातार्इ म्हात्रे यांनी पराभव केला होता तेथील लढती सेना किंवा राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाला संधी देवून जार्इल अशी चर्चा आहे.इकडे ठान्यात सेना भाजपा राष्ट्रवादी आप आपलं बस्तान बांधून आहे.त्यांच्यात चुरशीचा प्रश्‍नच येत नाही.कोण वाढलं,कोण कमी झालं याला महत्व ठाण्यात नाही.परंतू ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री पद नवीमुंबर्इ,ठाणे यांनाच आजपर्यंत दिलं गेले आहे त्यामध्ये यावेळी काही बदल होर्इल की नवी मुंबर्इच्या गळयात पालकमंत्री पदाची जबाबदारी जार्इल हे येत्या निवडणूकीत ठरणार आहे.
            ठाणे जिल्हयातील 24 आमदार राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार हे घोष वाक्य आता पालघर आणि ठाणे अशा दोन जिल्हयात विभागला गेलं आहे त्यामुळे 24 असून राजकीय डेरिंग येथील आमदारात राहिली नाही त्यांची मिशाल वरिष्ठांनी झेंडे बदलून नष्ट केली आहे.यांनी स्थानिक पदाधिकारी,लोकप्रतिनिधी लोकांच्या जिवावर उडया मारल्या तरी पक्षाची धुरा वरिष्ठांच्या हातात असल्याने गेली अनेक वर्षे ठाणे ग्रामीण भागांना मंत्री पदापासून वंचित ठेवले अशीच दबावतंत्राची निवडणूक होणार आहे.ठाणे जिल्हयातील भिवंडीमध्ये भाजपा विरूध्द शिवसेना अशी लढत झाल्यास इतर पक्षांचा उमेदवार निवडून येवू शकतो मात्र,सेना भाजपा युती झाल्यास सेना भाजपामधील अम्तर्गत कलह पुराभुतांना वाली ठरू शकतो.
            शहापूर मतदार संघात पुन्हा पांडूरंग बरोरा येर्इल शक्यता कमी वाटते तेथील शिवसेना निष्ठावंत आणि आयाराम यांच्यात असलेला अंतर्गतवाद राष्ट्रवादीला पुन्हा संधी देवू शकतो.कल्याण ग्रामीण मध्ये सेना भाजपा मनसे अशा लढती अटीतटीच्या तसेच डोंबिवली,कल्याण पुर्व,उल्हासनगर,अंबरनाथ येथील नव्या चेहर्‍यांना संधी मिळू शकते मात्र,जुन्याच प्रस्थापितांना उमेदवारी दिल्यास नवे चेहरे कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना लॉतरी लागणार आहे.
            राहिला मुरबाड विधानसभेचा मुद्दा येथे सेना भाजपा राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होर्इल त्यावेळी भाजपा राष्ट्रवादीत खरी लढत होर्इल.ज्यांना शरद पवारांनी 25 वर्षे आमदारकीला थांबवून ठेवलं,जातीची गणिते केली त्यांनीच शरद पवारांना धोका दिला आणि जातीवर नेतृत्व केला त्यांना किसन कथोरेने धक्का दिला त्यातच पवार नेतृत्व सेनेत गेले आणि सेनेचे बदलापूरचे दोन इच्छूक त्यात मुरबाडची भर पडली त्यामुळे येथे सेनेचा आमदार होणे शक्य नाही आणि सेना भाजपा युती झाल्यास भाजपा शिवाय पर्याय नाही.
            मुरबाड विधानसभेत प्रमोद हिंदुराव प्रथमच विधानसभेत येतात.जिल्हापरिषदेला कुठेही उबा राहिले तरी निवडून आलेले माजी सिडकोध्यक्ष तसेच खिशात हात घालून नेता म्हणून नावलौकिक आहे.त्यांच्या सहभोवतीचा दरवडलेला श्‍वास मोकळा झाला आहे त्यामुळे त्याचा प्रवास लोकाना आवडेल अशी चर्चा आहे.दुसरीकडे एका नेत्याचा खिशात हात जात नाही ज्यांना सांगतात मदत करायाला त्यांच्याकडुन मदत होत नाही त्यामुळे नाराजी आणि तिसरे नेतृत्व आपल्या मुलांच्या हातात चाव्या त्यांच्याकडे असणारेच ओळखतात अशा स्थितीत मुरबाड विधानसभेत सध्या प्रमोद हिंदुरावांच्या स्वागताच्या पतंगा उडत असुन भाजपा राष्ट्रवादीत खरी लढत होर्इल विजय कोणाचा हे महिनाभरात कळेलचं.

Post a comment

 
Top