BY -
युवा महाराष्ट्र लाईव्ह - औरंगाबाद ।
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी अत्यंत
महत्त्वाचं असलेलं जायकवाडी धरण 98 टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. शनिवारी रात्री
8 वाजल्यापासूनच पैठण जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करुन एकूण 1589
क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलंय. शिवाय डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे.
त्यामुळे धरणाखालील भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, नदीच्या पात्रात जाऊ नये, असं
आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केलं आहे.
Post a comment