0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने मोठे केलेले नेते पदासाठी पक्षांतर केले त्यांचा परिणाम पक्षावर होणार नाही.राष्ट्रवादीपक्षात खरे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.त्यांच्या बळावर मतदाराच्या पाठिंब्यावर मुरबाड विधानसभेत राष्ट्रवादीचा उमेदवार 90 हजार मतानी निवडुन येर्इल असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.विकास म्हणजे काय तर सामान्य माणसाला अर्थिक बळ रोजगार शेतकर्‍याला बळ असे सांगुन मुरबाड विधानसभेत फेकू  बोबळतो लोकाना सर्व समजते येथील जुने जाणते कार्यकर्ते राष्ट्रवादी सोबत आहेत.शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मतदार या मतदार संघात असल्याने आजपर्यंत राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता सर्वच स्वाराज्य श्रेत्रात राहिली आहे.मुरबाड तालुका कै.शांतारामभाऊ घोलप यांनी विकास घडवुन आणलेला तालुका आहे.मुरबाडच्या विकासासाठी नवयुवक मोठया संख्येने राष्ट्रवादीत सामील होत आहेत असेही सांगितले.प्रत्येक  संकटसमयी शरदचंद्र पवार यांच्या बरोबर आहे.त्यांच्या पाठिशी शरदचंद्र पवार अजितदादा पवार सुप्रियातार्इ सुळे जयंत पाटील यासह सर्व नेते आणि स्वता प्रमोद हिंदुराव आपल्या सोबत आहेत.कोणतेही आडचण आल्यास कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आपले कार्यकर्ते पाठिशी खंबीर उभे राहातील असे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.मुरबाडच्या नमस्कार हॉलमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पाडला  जिल्हापरिषद सदस्य जयराम मेहेर,कल्याण तालुका राष्ट्रवादी काँगे्रस अध्यक्ष विकास कुंभार,जुवारी मंगळनाना,अ‍ॅड.प्रमोद चौधरी,कालीदास देशमुख,बाळाराम सुर्यराव (देशमुख मराठा समाज अध्यक्ष), यांच्यासह व्यासपिठावर मोठया प्रमाणात जेष्ठ नवयुवक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.पितृपक्षात चांगले काम करायाचे नसते म्हणतात परंन्तु राष्ट्रवादीला पितृपक्ष शुभदायक आहे.35 दिवसाचा कालावधी निवडणुकासाठी आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागा आरेला कारे करणारे आमचे कार्यकर्ते  कोणाच्या दबावाला बळी पडू नका प्रत्येक सामान्याच्या अर्थिक विकास बळासाठी कठिबध्द राहुन लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देवू असे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.यावेळी प्रमोद हिंदुराव यांनीच निवडणुक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी लावून धरला आणि पदाधिकार्‍यांच्या नियुक्या सुरू झाल्याने युवकानी एकच गर्दी केली आहे.राष्ट्रवादीत नव्या विचाराचे युवक महिला सामील होत आहेत.

Post a comment

 
Top