0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – धुळे |
बिबट्याने कोंबड्याच्या बंदीस्त पोल्ट्रीत घुसत 850 कोंबड्याचा फडसा पाडला आहे. अवघ्या चार महिन्यात तीन लाख खर्च केलेल्या कडनाथ व कावेरी कोंबड्यांची सर्व पोल्ट्री बिबट्याने फस्त केल्याने तरुण व्यावसायिक हतबल झाला आहे. साक्री तालुक्यातील भोकडखेत शिवारात रविवारच्या रात्री बिबट्याने कोंबड्याच्या बंदीस्त पोल्ट्रीत घुसत 840 कोंबड्याचा फडसा पाडला.भडगाव येथील रावसाहेब ओंकार बेडसे या सुशिक्षित तरुणांने 'बोकडखेत' शिवारात खर्चिक असलेला कडनाथ व कावेरी कोंबड्यांचा पोल्ट्री उभारला आहे. खर्चिक व्यवसाय असल्याने बेडसे कुटुंबास शेतात राहतात. रात्री एकच्या सुमारास बिबट्याने बंदीस्त जाळी उकरत कोंबड्यावर हल्ला चढविला. निम्मेपेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्या असून उर्वरीत भीतीने मृत झाल्या आहेत. 

Post a comment

 
Top