BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मुंबई
।
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र
आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूकांची शनिवारी घोषणा केली. महाराष्ट्र आणि हरियाणा
विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या
तारखा जाहीर होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर सगळ्यात जिल्ह्यांत
कडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही आचारसंहिता लागू होताच मोठी कारवाई
केली आहे. तब्बल 67 लाख रुपये मुंबईच्या एलटी मार्ग परिसरातून जप्त करण्यात आले
आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.एका सामान्य दुकानातून एवढी मोठी रक्कम
पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पैसे नक्की कोणाचे आहेत?
एवढी रक्कम दुकानात कशासाठी ठेवण्यात आली? याचा आता पोलीस तपास करत आहेत. खरंतर आचारसंहिता
लागू झाल्यानंतर पोलीस खातं हायअलर्टवर असतं. अशात दुकानात मोठी रक्कम ठेवली असल्याची
माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दुकानावर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी तब्बल
67 लाख रुपये जप्त केले आहेत.
Post a comment