0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - आंध्र प्रदेश 
आंध्र प्रदेशच्या गोदावरी नदीत बोट उलटली आहे. ही प्रवासी बोट असून यात 61 लोक होते. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपाटन या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान सध्या या ठिकाणी एनडीआरफच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आज (15 सप्टेंबर) दुपारी 3.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ही बोट आंध्रप्रदेश पर्यटन विकास निगमद्वारे चालवण्यात येत होती. यात जवळपास 61 प्रवाशांचा समावेश आहे. त्यात काही बोट चालकाचाही समावेश आहे. ही बोट कच्चुलुरु या ठिकाणी उलटली.

Post a comment

 
Top