0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – जम्मू-काश्मीर।
मागील एका महिन्यात काश्मीर खोऱ्यात जवळपास 60 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे (Jammu Kashmir) पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक नागरिकांचा दहशतवादी संघटनांमध्ये होणारा सहभाग सध्या सर्वात कमी असल्याचा दावा केला आहे. मागील 45 दिवसांमध्ये केवळ 2 लोक दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं.एका अधिकाऱ्याने सांगितलं, सैन्य आणि सीमा सुरक्षा दलासह इतर अनेक संस्थांच्या माहितीच्या आधारे संबंधित परदेशी दहशतवाद्यांची संख्या समोर आली आहे. श्रीनगर आणि अन्य क्षेत्रांमध्ये दहशतवाद्यांचा वावर सुरक्षा दलांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. श्रीनगरमधील दहशतवाद्यांनी स्थानिक लोकांना धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Post a comment

 
Top