0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड,कल्याण, भिंवडी, अंबरनाथ या चार तालुक्यातील व ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,भिंवडी,मिराभाईंदर,अशा सहा महानगर पालिका क्षेत्रामध्ये रविवार दि .15 सप्टेंबर 2019 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. बुथवर लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या बालकांना  मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2019 ते शुक्रवार दि.20 सप्टेंबर 2019  या कालावधीत घरोघरी भेटी देऊन लस  देण्यात येणार आहे.तरी या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ठाणे मनिष रेंगे यांनी केले आहे.

Post a comment

 
Top