0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा, ठाणे |
आश्रमात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेवर रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण-मुरबाड रोडवरील पाचवा मैल परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेवर दारुच्या नशेत बलात्कार करणार्‍याला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उल्हासनगरमध्ये राहणारी एक 50 वर्षीय महिला कल्याण मुरबाड रोडवरील असलेल्या एका आश्रमात सेवेकरीचे काम करते. ती दररोज उल्हासनगरहून आश्रमात पायी ये जा करते. सोमवारी 23 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे महिला रात्री पावणेनऊच्या सुमारास आश्रमातून घरी जाण्यास निघाली. त्यावेळी अचानक रस्त्यात एक तरुण तिच्या समोर आला. त्याने जबरदस्ती करत त्या महिलेला शेजारी वाढलेल्या गवतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या नंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. सदरहु घटनेचा पोलिसांनी कौशल्यापुर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.सदरची कामगिरी ठाणे ग्रामीण जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड,मा.अपर पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील,मुरबाड विभागाचे उप विभा.पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे,महिला सहा.पोलिस निरिक्षक ज्योती वानखेडे,पो.उपनिरिक्षक बजरंग राजपुत,प्रदिप आरोटे,विजय सुर्वे,किशोर धायगुडे,कमलाकर मुंढे,प्राची पांगे,एएसआय.ए.डी.पाटील/पो.ना दर्शन सावळे,तुषार पाटील,नितीन विशे,भारत आहिरे,संदिप आहेर,पोशि सोमनाथ भांगरे,योगेश वाघेरे,निकेश मांडोळे,चालक घोडे आणि कर्मचारी यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.


Post a comment

 
Top