0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
येत्या 48 तासात राज्यभरात मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि गोव्यात पावसानं जोर धरला आहे. रात्रीपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस आला यामुळे मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आले आहे.

Post a comment

 
Top