0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदाबाद |
भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह अॅडमिट झाले आहेत. अमित शाहांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.त्यांच्या 4 ते 5 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या.अमित शाह यांच्यावर के डी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. अमित शाह हे नुकतंच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह हे एक तारखेला सोलापुरातील भाजपच्या महाजनादेश यात्रेला उपस्थित होते. त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

Post a comment

 
Top