0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - पुणे ।
कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक घटनेची तरुण पिढीला सविस्तर माहिती मिळावी यासाठी लवकरच शालेय अभ्यासक्रमात (Article 370 in syllabus) याचा समावेश करण्यात येईल, असं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले. पुणे येथील जन जागरण सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक घटनेची तरुण पिढीला सविस्तर माहिती मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे जाणून घेण्याची त्यांची रुची वाढणे गरजेचे आहे. त्यामुळं लवकरच शालेय अभ्यासक्रमात कलम 370 चा  समावेश करण्यात येईल, असं भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. त्याचबरोबर फुटीरतेला प्रोत्साहन देणाऱ्या बीजाचे समूळ उच्चाटन केल्याचं त्यांनी म्हटलंय.

Post a comment

 
Top