0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सांगली  |
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. विसर्गामुळे आयर्विन पूल सांगली येथील पाणीपातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 33 फुटांवर गेली आहे. कोयना व इतर धरणातून वाढलेला विसर्ग यांचा विचार करता ती 34 ते 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.103.51 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणातून 69 हजार 739 क्युसेक, धोम धरणातून 6 हजार 995 क्युसेक, कन्हेर धरणातून 5180 क्युसेक, उरमोडी धरणातून 4 हजार 286 क्युसेक, तारळी धरणातून 1601 क्युसेक आणि वारणा धरणातून 11 हजार 894 क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्याचे पर्जन्यमान व कोयना व इतर धरणातून वाढलेला विसर्ग यांचा विचार करता ती 34 ते 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top