BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई ।
मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी वादावादी नवीन नाही. मध्य रेल्वेवरील
आसनगाव लोकलच्या दरवाजात उभं राहण्यावरुन झालेल्या वादाने कळस गाठला. 25 वर्षीय तरुणाने
सहप्रवाशाच्या बोटाचा भाग चावून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रथम दर्जाच्या
डब्यात हा प्रकार घडला.34 वर्षीय महेश पांडुरुंग ढुंबरे यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीचा
म्हणजेच पहिल्या बोटाचा एक सेंटीमीटर भाग तुटला आहे. 25 वर्षीय आरोपी आसिफ युसूफ शेखला
रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ढुंबरे यांना तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया
करावी लागली.
Post a comment