0
 BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबर्इ |
जगापेक्षा वेगळं काही तरी करण्याची धमक आणि कतृत्वानाचा नारा सगळयांच्या अंगी असते परंतू जो दुसर्‍याच्या आनंदासाठी जगतो व दुसर्‍यांचा विचार आपल्या कुटूंबामधील सदस्य म्हणून करतो अशा महान व्यक्तीची खरी आज समाजाला गरज असते.मग तो सामाजिक कार्यातून कार्य करत असेल किंवा अन्य क्षेत्रातुन.असा सामाजिक सलोखाचा वारसा आणि माणसातील माणूसकी नैतिकता टिकवली ती युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने.कधीही स्वतःचा विचार केला नाही नेहमी जगतातले एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजाला काही तरी देणं लागत या सदभावनेने ज्यांनी समाजासाठी कष्ट घेतले आणि मदतीचा हात देत समाजाला संस्कृतीमध्ये आणण्याचे ज्यांनी काम केले अशा हिर्‍यांची पारख युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने केली.आणि गर्वाने,अभिमानाने महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी संपुर्ण आयुष्य घालवले,ज्यांनी युवा पुढाकार घेतला अशांचा गौरव करण्याचा मानस महाराष्ट्रातून आज युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने मिळवला असल्याचे समोर येत आहे.
गेले अनेक वर्षे मोठया अभिमानेने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने संस्था चालवली असून युवा अभिमान पुरस्कार पुरस्कर्तेंची निवड करत त्यांचा सन्मान केला आहे.आज समाजात सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय,चित्रपट सृष्टीतील कलाकार,उद्दयोजक, साहित्य, गुणवंत कामगार,धार्मिक कार्य,पत्रकार व अन्य क्षेत्रातील मान्यवर असतील ज्यांनी कार्यशीलता जपली आहे अशांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे यादृष्टिकोनाचा पाया युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने सर्वप्रथम रोवला आणि सलग 2 रे वर्षात पुरस्कार देत पदार्पण केले त्यामुळे ज्या शब्दसुमनांनी मंचाचे उद्गार काढावे तेवढे कमीच आहे.या युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाचे संस्थापक अमितजी शेटे साहेब व सचिनजी आचरे साहेब,अध्यक्ष संजयजी सावंत साहेब,सचिव सुभाष बावडेकर साहेब यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील आज होतकरू समाजसेवकाचे सन्मान होण्याचा योग दिसून येत आहे.असाच योग युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने पुन्हा शनिवार दि.21.09.2019 रोजी घडवून आणला.
कै.आण्णाभाऊ साहेब पाटील सभागृह,कोपरखेरणे,नवी मुंबर्इ येथे युवा पुरस्कार आयोजित केला होता.प्रथम मधूर संगीताने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संजय शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख अतिथी लोकनेते मा.मंत्री गणेश नार्इक यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी व्यासपिठावर मा.खासदार डॉ.संजीव गणेश नार्इक,माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे,सातारा सहकारी बँकेचे चेअरमन ज्ञानेश्‍वर बांगडे,नसगरसेवक शंकर मोरे,नगरसेवक लक्ष्मीकांत पाटिल,नगरसेविका दमयंती आचरे,नगरसेविका सायली शिंदे आदि नामवंत,दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.दिप प्रज्वलनांतर अध्यक्ष संजयी सावंत यांनी मनोगत मांडले तर संस्थापक अमितजी शेटे यांनी प्रास्ताविक मांडले त्याचबरोबर विविध पुरस्कर्ते यांनी थोडक्यात युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाच्या कार्याची वाटचाल आणि समाजामधील माणूसकीची व्याख्या सांगतिली.यावेळी 77 पुरस्कर्ते यांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर यशवंराव चव्हाण युवा मंचाचे अध्यक्ष संजयजी सावंत यानी काढलेल्या यशवंतनिती पुस्तकाचे प्रकाशन मा.मंत्री गणेशजी नार्इक व व्यासपिठावरील प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले.
--------------------------------------------------------
मा.मंत्री गणेश नार्इक - अंतरंग कसा असावा तर स्वच्छ मनाचा व फुलासारखा दरवळणारा असावा अशा विचाराने गणेश नार्इक यांनी युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाच्या कार्याची प्रशंसा करित त्यांच्या व यशवंतराव चव्हाणांविषयी काही जुन्या आठवणी सांगून त्यांनी केलेल्या कार्याची पोहोच पावती दिली.व नेहमी माणसाने पैशाच्या मागे न पळता यशामागे धावावे कारण पैसा यशा सोबत असतो त्यामुळे ज्या पैशाने मला झोप लागत नाही तो पैसाच मला नको अशा उदाहरणाने पैशाचा मोल माणूसकीपेक्षा शुन्य आहे.आणि जी माणूसकी आहे ती इथेच नंतरचे माहित नाही परंतू खर्‍या हिर्‍याची पारख एक सच्चा आणि प्रामाणिक होतकरूच करू शकतो आणि ती आज युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाने युवा पुरस्कर्ते यांची करून ते सिध्द केले की,दुरदृष्टी नैतीकतेची हवी,स्वाभिमानाने जगण्याची हवी आणि अभिमानस्पदाची हवी अशा कडाडीच्या संभाषणाने सभागृह दणाणून गेला होता.
त्यांनी आपल्या संभाषणात युवा शक्ती सामाजिक संस्था व यशवंराव चव्हाण युवा मंचाचे संस्थापक अमितजी शेटे व सचिन आचरे,अध्यक्ष संजयी सावंत,सचिव सुभाष बावडेकर यांच्या कार्याविषयी प्रशंसाही करत त्यांच्या या सामाजिक कार्याला कौतुकाची थाप दिली व तरूण समाजाला एकत्र करणार्‍या घटकांची आज गरज असल्याचे मतही नवी मुंबर्इचे लोकनेते गणेश नार्इक यांनी आपल्या संभाषन मनोगतात मांडले.

Post a comment

 
Top