0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे सिव्हील वैधकीय अधिकारी तसेच ठाणे जिल्हा वरिष्ठ आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दुर्लक्षने मुरबाड तालुक्यातील साथीच्या रोगावर मातकरण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे.येथील शासकीय सर्वच रूग्णालयात प्राथमिक आरोग्य केंन्द्रात दोन हजाराच्यावर परडे रूग्ण उपचारासाठी येत असुन त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत.कुठे डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत औधषे आहेत तर डॉक्टर नाहीत असा मनमानी कारभार भाजपा सेना युतीच्या सत्तेत चालला आहे.गोरगरीब रूग्णांना औषधौचार करण्यास पैसा नसल्याने गोरगरीब हैराण झाले आहेत.शासनाकडुन ठाणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी रूग्णालयात औषधे येतात त्याचा वापर मासिक कुठे आणि किती प्रमाणात रूग्णांवर होतो उर्वरित औषधे कुठे जातात यांची शासनाने चौकशी करावी अशी मांगणी होत आहे.

Post a comment

 
Top