0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ आपले काम यशस्वीरित्या पार पडत आहे. आता चांद्रयान-2 चे चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. ‘चांद्रयान-2’ ने या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा केला आहे. चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. यानंतर आता एक महत्त्वाचा टप्पा चांद्रयान 2 पार पाडणार आहे. मंगळवारी चांद्रयान -2 यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली होती. आता आता इस्रोने चांद्रयानाला चंद्रावर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. आज चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' वेगळा होणार आहे.  7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे. 

Post a comment

 
Top