0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद  |
पैठण जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व नासिक जिल्ह्यातील पावसाचे पाणी कमी अधिक प्रमाणे धरणात दाखल होत आहे. गुरुवारी सकाळी धरणाचे 16 दरवाजे दोन फुट वर उचलुन 35 हजार क्यूसेक याप्रमाणे गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात वरच्या धरणातुन 54 हजार क्यूसेक यावेगाने पाण्याची आवक सुरू आहे. दुपार नंतर पाण्याचा वेग पुन्हा वाढणार आहे. यानंतर धरणाचे सर्व दरवाजे उघण्याची वेळ येऊ शकते असे धरण उप अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. विसर्गात वाढ केल्याने गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

Post a comment

 
Top