0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – नवी दिल्‍ली 
महाराष्‍ट्र, हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली आहे. या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली असून महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होऊन 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी विद्यमान विधानसभेची मुदत संपणार आहे, त्यामुळे त्याआधी निवडणुका होणं आवश्यक आहेत. राज्यात चार प्रमुख पक्षांवर सर्वांची नजर असणार आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचबरोबर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या कामगिरीवर अवघ्या राज्याची नजर असणार आहे. महाराष्ट्रात 288 जागा तर हरियाणात 90 जागांसाठी मतदान होईल. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून हरियाणात 1 कोटी 84 लाख मतदार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभा आणि हरियाणा विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 9 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी संपत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

Post a comment

 
Top