0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - नवी दिल्ली । 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी गृहनिर्माण व निर्यात क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. परवडणारे आणि मध्यमवर्गीय गृहनिर्माण प्रकल्प जे एनपीए नाहीत, दिवाळखोरी कोर्टात नाहीत आणि त्यांची नेटवर्थ आहे, त्यांना खास खिडकीद्वारे मदत केली जाईल. असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र निधी तयार केला जाईल. त्यात सरकार 10 हजार कोटी रुपयांचे योगदान देईल. इतर गुंतवणूकदार समान रक्कम देतील. यामध्ये एलआयसी, काही इतर संस्था, बँका आणि सार्वभौम निधीचा समावेश असेल. ही योजना देशातील रखडलेली साडेतीन लाख घरे पूर्ण करण्यात मदत करेल. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्याची घोषणा एका महिन्याच्या आत करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 30 ऑगस्ट रोजी बँकांचे विलीनीकरण आणि 23 ऑगस्ट रोजी विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची घोषणा केली होती.

Post a comment

 
Top