0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई 
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या महाराष्ट्रातील हजारो खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना दिवसाला फक्त एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवलं आहे. यामुळेच बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मंगळवारी सकाळी पीएमसी बँकच बंद झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र, तसं काहीही नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. असं असलं तरी दिवसाला फक्त १ हजार रुपयांचंच बंधन टाकण्यात आल्यामुळे खातेदारांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.मंगळवारी सकाळी बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर मेसेज पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यासोबतच, बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या 6 महिन्यांत त्यावर उपाय योजण्यात येतील, असंदेखील आश्वासन बँकेचे एमडी जॉय थॉमस यांनी दिलं आहे.

Post a comment

 
Top