0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |

कल्याण तालुक्यातील पळसोली या गावला विदूत पुरवठा करणारा  ट्रान्सफॉर्मर 20.7.2019 रोजी जळाला होता  त्या संबंधी तक्रार गावातील ग्रामस्थांनी वसिंद येथील MSEB कार्यालयात करण्यात आली होती परंतु, MSEB वसिंद कार्यालयाचे प्रमुख अधिकारी या ग्रामस्थांच्या विषयाकडे सतत दुर्लक्ष करत असून आजपर्यंत हा ट्रांफॉर्मर बदलण्यात आला नाही. मागितलं 15 दिवसांपासून या गावातील ग्रामस्थ अंधारात असून या गावात पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही तसेच लाईट नसल्याने मोठ्या संख्येने लोक आजारी पडत आहेत. या विषयाला पुढारी अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नाही हे लक्षात येताच गावातील सर्व महिलांनी वसिंद MSEB धडक मोर्चा काढला आहे या विषयाला न्याय मिळत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची हमी मिलत नाही तो पर्यंत आम्ही घरी जाणार नाही अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे. तर महिला मोर्चाची तीव्रता बघून अधिकारी लोकांनी कार्यालयातून पळ काढला आहे.

Post a Comment

 
Top