0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धोका पातळीपासून केवळ 2 फूट कमी आहेत.गगनबावडा, पन्हाळा मार्गे कोकणाशी संपर्क तुटला आहे. तर मांडुकली,केर्ली मार्गावर पुराचे पाणी शिरले आहे.राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालाही याचा फटका बसत आहे. किणी परिसरात वारणा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील 9 मार्ग पूर्ण बंद करण्यात आले आहेत. तर 80 बंधारे पाण्याखाली असून एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.

Post a comment

 
Top