0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कर्जत |
कर धोक्यात घालुन रेल्वे लाईन ओलांडु नका, जीवन अनमोल आहे रेल्वे लाईन ओलांडु नका ह्या व अशा अनेक घोषणा रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वारंवार देत असते तसेच ह्या विषयी प्रवाशी सुरक्षा अभियानही रेल्वे प्रशासनाकडुन राबविले जाते. परंतु, मध्य रेल्वे मार्गावरील भिवपुरी रेल्वे स्थानकात मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मागील दोन ते तीन महिण्यांपासुन स्थानकातील पादचारी पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे नाईलाजस्तव रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालुन रेल्वे लाईन ओलांडुन फलाटावर यावं लागत आहे
तसेच अनेकदा स्थानकात मालगाडी उभी असल्यानेही रेल्वे प्रवाशांना मालगाडी घालुनच फलाटावर यावं लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांसह महिला प्रवाशी, विद्यार्थ्यी व इतर अनेक प्रवाशांना मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. 
मालगाडी घालुन फलाटावर येतेवेळी जर मालगाडी सुरु झाल्यास हकनाक रेल्वे प्रवाशांना जीवास मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी महोदयांनी लवकरात लवकर भिवपुरी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम करून रेल्वे प्रवाशांसाठी पादचारी पुल खुला करावा. हि नम्र विनंती.


Post a comment

 
Top