0
BY - महेश भगत,युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा |
टिटवाळा रेल्वे स्थानकानजिक रेल्वे रूळ ओलांडताना भरधाव मेलच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी रेल्वे रूळ ओलांडून पुढे गेल्याने बचावली असून किरकोळ जखमी झाली आहे. गणपत श्रीपती कांबळे (वय-56) असे मेलच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते टिटवाळा परिसरात राहत होते.गणपत कांबळे हे पत्नी मुलासह टिटवाळ्यातील नारायण नगर परिसरात राहत होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास कांबळे पत्नीसह टिटवाळा स्थानकानजिक रेल्वे रूळ ओलांडत होते. यावेळी त्यांची पत्नी रेल्वे रूळ ओलांडून पुढे गेली. मात्र, याच वेळी कसाराकडून येणाऱ्या निजामुद्दीन-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट मेलने गणपत यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Post a comment

 
Top