0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचा मानस देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत सरत्या वर्षाच्या सुरुवातीपासून (जाने' २०१९) मांडला होता, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून.देवा ग्रुपची शान श्री.भूषण मोरे (तानाजी भाऊ मोरे यांचे बंधू) यांनी आपल्या सहपत्नी (साधना।मोरे) व चिरंजीव (नक्ष मोरे) यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर येथील अनाथाश्रमात गोंडस मुलांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला व त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.या प्रसंगी स्वामींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला असून लहान मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पासून ह्या वर्षीचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे समाधान भूषण भाऊ मोरे यांना लाभले.

Post a comment

 
Top