0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे. कळव्यातील अटकोनेश्वरनगर येथील ज्ञान गंगा शाळेजवळ आदर्श चाळ आहे. या ठिकाणी ही घटना घडली. डोंगराचा काही भाग जवळच्या घरांवर पडला. या ढिगाऱ्याखाली एकाच कुटुंबातील तीन जण अडकले होते. यामधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी आहे. जखमी व्यक्तीवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 40 वर्षीय बीरेंद्र जसवार आणि 10 वर्षीय सनी जसवार यांचा समावेश आहे. तर निलम जसवार यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Post a comment

 
Top