0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

26 जुलै 2005 मध्ये झालेल्या पावसापेक्षा यावर्षी 25 जुलैपासुन सुरू झालेल्या पावसानी पुन्हा 26 जुलै घडवुन आणला.यावर्षी मात्र गेल्या 26 जुलै पेक्षा जास्त पाऊस पडला असुन ठाणे जिल्हयासह कोकणाला पावसाने झोडपले.मुसळधार पावसात कोटी रूपयांचा नागरिकाचा नुकसान झाला असुन प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि राजकीय सत्ताधार्‍यांचे श्रयवाद सात्वन यावर लोकानी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.पावसात आडकलेल्या प्रवाशाना नागरिकाना स्थानिक समाजसेवक लोकानी बाहेर काढले खानपिणा पुरवलं मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करून भरपार्इ दिली नाही.शालेय विद्यार्थ्याची पुस्तके घरातील अन्नधान्य पावसात भिजले अनेकांची घरे मोडली ग्रामीण भागात सरकार आणि संबधित प्रशासन तहसिलदार यांचा मदतीचा हात पोहचला नाही.तहसिलदार कार्यालय रेल्वे महानगरपालिका यांच्या आपत्कालीन यंत्रणा दिखाव्याची ठरली आहे.अनेक वाहाने रस्त्यावर आडकुन पडली होती.ट्रॉफीक जाम रेल्वे बंद याचा फटका काही प्रवाशाना बसला कल्याण ते उल्हासनगर रिक्षा प्रवास 150 रू लुटीचा ठरल्याने प्रवाशानी तिव्र नाराजी करून समाजसंघटना राजकीयपक्ष सत्ताधारी प्रशासनानी प्रवाशाना वाहाने नेहमीच्या भाडेपट्टयात उपलब्ध करून देणे गरजेचे होतं मात्र प्रवाशाच्या संकटाचा फायदा काही लुटारू रिक्षाचालकानी घेतला अशा घटनाना यापुढे आळा बसला पाहिजे असे मत प्रवाशी सागर दळवी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

 
Top