0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे. दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.कपिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, जगन्नाथ पाटील यांच्या पत्नी पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, पाटील यांनी आपली प्रत्येक जबाबदारी निष्ठने पार पाडली आहे. नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्या मुलीने लिहिलेले कळसाचा पाया हे पुस्तक म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत पारदर्शी काम त्यांनी केले. उत्पादन शुल्क मंत्री असताना त्यांनी एमआरपी प्रणाली आणली. चांगले वक्तृत्व असल्यामुळे ते सभागृहात प्रत्येक विषयावर बोलायचे त्यातून आम्हालाही शिकायला मिळाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिल्यामुळे ते आजपर्यंतचा हा प्रवास करू शकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक विचारधारा घेऊन काम केले. त्यांच्या कार्याचा अनुभव आम्हाला नेहमीच कामात उपयोगी पडतो. अविरतपणे त्यांनी ठाणे जिल्ह्यात काम केले आहे असेही त्यांनी सांगितले.


Post a comment

 
Top