0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुणेजिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे राजगड असं नामकरण, करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वेल्हा तालुक्यातील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा वेल्हा तालुक्याचा इतिहास आहे. तसेच किल्ले राजगड देखील वेल्हा तालुक्यातच आहे. येथूनच शिवरायांनी अनेक वर्षे ह्याच ठिकाणाहून स्वराज्याचा कारभार केला होता. तसेच स्वराज्याचे स्वप्न ही ह्या ठिकाणाहून पाहिले व जपले  ते प्रत्यक्षात ही आणले, असं सुप्रिया सुळेंनी यांनी सांगितले.

Post a comment

 
Top