0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा आता संपला आहे. पावसाच्या रिमझिम सरी राज्यभरात बरसल्या आहेत. मुंबईतही पाऊस बरसला. मात्र सुरुवातीला गारवा देणारा हा पाऊस मुंबईकरांसाठी हळुहळू अडचण होऊन जातो. सततच्या पावसामुळे मुंबईकरांची कोंडी होते. तसेच मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त बैठक बोलावली आहे.पावसाळ्यात मुंबईतील पुल हे बंद ठेवण्यात येतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. वाहतूक कोंडी टाळता यावी, त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त बैठक बोलावली आहे. आज दुपारी वर्षा या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी संयुक्त बैठकीची मागणी केली होती.

Post a Comment

 
Top