0
BY - युवा महाराष्ट्र लाइव -  वर्धा

कर्जमाफी मिळूनही लाभ न मिळाल्याने हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गेल्या फेब्रुवारी महिन्यात घडली होती. या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरुन नायब तहसीलदारांनी वडनेर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मंत्रालयातून चौकशीचे आदेश आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. गौतम जांभूळे असं गुन्हा दाखल झालेल्या बँक व्यवस्थापकाचं नाव आहे.गणपत भोरे या शेतकऱ्याने गेल्या 26 फेब्रुवारीला विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. पत्नी, मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब होतं. गेल्या वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे, ग्रामशक्ती या खासगी फायनान्स कंपनीचं तीन लाख रुपये तसेच इतर दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज होते. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

Post a Comment

 
Top