0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जलवायू परिवर्तनाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनवर आरोप केले आहेत. ट्रम्प म्हणाले की, भारत, चीन आणि रुसमध्ये शुद्ध हवा आणि पाणी नाही. तसेच हे देश जागातील पर्यावरणाविषयी आपली जबाबदारी निभावत नाहीत.ट्रम्प यांनी ब्रिटिश चॅनल आयटीव्हीला मुलाखत दिली. पॅरिस जलवायु करारातून बाहेर पडलेल्या ट्रम्प यांनी दावा केला की, जगभरात यूएसमधील जलवायु सर्वात स्वच्छ आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, यूएसमध्ये सर्वात स्वच्छ जलवायु आहे हे मी आकड्यांच्या आधारावर सांगत आहे. यूएसमधील जलवायू दिवसेंदिवस स्वच्छ होत आहे. पुढे ते म्हणाले की, चीन, भारत, रुस आणि अन्य देशांकडे स्वच्छ हवा, पाणी नाही. तसेच त्यांना प्रदूषण-स्वच्छता याविषयी समजही नाही. ट्रम्प पुढे म्हणाले की, मी या शहरांचे नाव घेणार नाही मात्र मला ठाऊक आहे. तुम्ही या शहरात गेल्यावर श्वासदेखील घेऊ शकणार नाही. हे देश आपली जबाबदारी योग्यप्रमाणे निभावत नाही.

Post a Comment

 
Top