0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात तब्बल 28 वेळा मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.30 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. तर तब्बल 12 वेळा नीप टाइड येणार आहे. यामुळे समुद्राला मोठी भरती असताना नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात दर दिवशी भरती आणि ओहोटी असते. पावसाळ्यादरम्यान समुद्रात उंचंच उंच लाटा उसळतात. अशावेळी मुसळधार पाऊस असल्यास मुंबईच्या सकल भागात पाणी तुंबते. त्या दृष्टीने यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगर पालिकेने समुद्रातील मोठ्या भरतीच्या तारखा प्रसिद्ध केल्या आहेत.

Post a Comment

 
Top