0
BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
जबाबदारीपासून माघार होणे आणि जबाबदारी सांभाळत असताना दुर्लक्ष करण्याचा बहाणा करणे या एकच बाजु आहेत.फक्त फरक ऐवढाच कि याच्याकडे जबाबदारी देऊ की त्याच्याकडे.अशाच जबाबदारीपासून नेहमी 1्र0 पाऊल माघार घेणारी मुरबाड नगरपंचायतीला शिवभक्त प्रतिष्ठाणांच्या पदाधिकार्‍यांनी चांगलीच चाप बसविली आहे.जाणीव नसताना जाणीवाची बाब लक्षात आणून दिली आहे.
पुण्यश्‍लोक आहिल्याबार्इ होळकर यांच्या जयंतीनिमीत्त विविध उपक्रम साजरे केले जातात परंतू मुरबाड येथिल चौक फलकावरील आहिल्याबार्इ होळकरांच्या नामफलकाची दुरावस्था ही झाली होती.याबाबत सामाजिक कार्यात अग्रेसर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्राण प्रतिष्ठा जोपासणार्‍या शिवभक्त प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांनी मुरबाडच्या नगरपंचायतीच्या लक्षात सदरची दुर्लक्षता बाब आणून दिली आहे.यावेळी तात्काळ फलकाची स्वच्छता करण्यात आली व संध्याकाळी अहिल्याबार्इ होळकर यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन करण्यात आले.एक कदम स्वच्छता की ओर म्हणणार्‍या शासनानी एक कदम दुर्लक्ष की ओर असा टोलाही यावेळी संतप्त शिवभक्तांनी मारला.मुरबाडच्या सर्व वार्डातील नामफलकांची व अन्य प्रतिमा फलकाची जबाबदारी मुरबाड नगरपंचायतीची असताना नगरपंचायत याकडे मात्र जाणून बुजून कानाडोळा करत आहे.ज्याकडे लक्ष द्दयायचे आहेत त्याकडे देत नाही आणि जेथे नाही तेथे हम करे सो कायदा करते असेच दिसते अशा मनातील संतप्त भावनाही यावेळी आमच्याशी बोलतांना व्यक्त केल्या.यावेळी शिवभक्त प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गणेश मोरे,गणेश सासे,प्रथमेश सावंत,संदिप घोलप,विकास भांडे,प्रविण भोर्इर,निलेश आगिवले,अजय देशमुख व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top