0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |  

मुरबाड तालुक्यातील तीन हजार आदिवासी नागरिक रोजंदारीसाठी घाटमाथ्यावर करतात दररोज जीवघेणा प्रवास करत असल्याची बातमी आमच्या ‘युवा महाराष्ट्र लाइव’ न्युज चॅनेलवर प्रसारित झाली होती.या बातमी मध्ये आम्ही आखोदेखा जिवघेणा प्रवास आमच्या चॅनेलच्या कॅमेरात रेकॉर्ड केला होता.मात्र याच बातमीचा इफेक्ट काल घाट माथ्यावर पहायाला मिळाला आहे.तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रोजंदारी नसल्याने या भागातील आदिवासी गोर गरीब लोकं कामासाठी घाट माथ्यावर जात असताना बनकर फाटयावर सुमो गाडीचा चिंचपाडा येथे अपघात झाल्याने चालकासह 12 प्रवासी जखमी झाले.या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उल्हासनगर सेंट्रल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. या तालुक्यात रोजगार नाही म्हणुन तीन हजार लोकं रोजगारासाठी स्थलांतर होत असतील मग त्यांच्या साठी सरकार का उपयोजना करत नाही असा सवाल जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंञ्याना विचाराला असून आता याकडे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष वेधतील का हे पहाण महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

 
Top