0
BY - गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई ।
आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यामुळे शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळी 11 वाजता राजभवनाच्या प्रांगणात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. तर भाजपच्या काही विद्यमान मंत्र्यांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याही यांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांचाही पत्ता कापण्यात आलाय.

Post a comment

 
Top